विषारी नागाला सर्पमित्राकडून जीवदान

। चिरनेर । प्रतिनिधी ।

चिरनेर येथील पत्रकार दत्तात्रेय म्हात्रे यांच्या शेतशिवारातील बांधावर असलेल्या जाळ्यात साधारणता पाच-सहा फूट लांबीचा विषारी नाग जाळ्यात अडकून पडला होता. हा विषारी नाग रात्रीच्या वेळी भक्ष्याच्या शोधात आला असावा. मात्र शिकार करण्याआधीच तो जेरबंद झाल्याने जाळ्यात निपचित पडला होता. स्थानिक सर्पमित्र जयवंत ठाकूर यांना शेतावर विषारी नाग असल्याची माहिती शेतकरी कृष्णा म्हात्रे यांच्याकडून मिळताच, ते घटनास्थळी हजार झाले. जयवंत ठाकूर यांनी या विषारी नागाची सुटका करून त्याला जीवदान दिले. त्यानंतर त्याला उरण तालुका वनविभागाच्या निर्देशानुसार सुरक्षित चिरनेर वनक्षेत्रात सोडून देण्यात आले.

Exit mobile version