रातवड विद्यालयात स्नेहसंमेलन

| माणगाव | वार्ताहर |

छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचालित माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयात स्नेहसंमेलन व आनंद बाजार शुक्रवार दि. 22 डिसेंबर व शनिवार दि. 23 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सुप्रसिद्ध लेखक दुर्गेश सोनार, छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी, माध्यमिक विद्यामंदिर रातवड विद्यालयाचे शालेय समिती अध्यक्ष संजय पालकर व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले.

स्नेहसंमेलन व आनंद बाजारच्या निमित्ताने विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज कलादालन रांगोळी प्रदर्शन, हस्तकला प्रदर्शन व चित्रकला प्रदर्शन, हस्तलिखित, रात्री विद्यार्थ्यांचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम, विविध वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी पारंपरिक तसेच आधुनिक विविध विषयांवरच्या वेशभूषांचे सादरीकरण केले. आनंद बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे खाऊचे स्टॉल्स मांडून विक्री केली. यावेळी कवी दुर्गेश सोनार, डॉ. नंदकिशोर जोशी, संजय पालकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ग्रुप ग्रामपंचायत भुवन सरपंच दीपक जाधव, सुभाष शिंदे, वैशाली जाधव, सुबोध जाधव, नागनाथ सुर्वे व जिल्हा परिषद शाळांचे शिक्षक, पालक, माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित शेडगे यांनी केले. या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यालयात विविध क्षेत्रातील मान्यवर, पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version