पत्रकार विकास मंचातील समाजसेवकांचा सत्कार


| पनवेल | प्रतिनिधी |

तालुक्यातील अग्रगण्य व शासन नोंदणीकृत असलेल्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचची सर्वसाधारण बैठक मंगळवारी (दि. 23) येथे पार पडली. मंचाचे अध्यक्ष विवेक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि सल्लागार अविनाश कोळी व सल्लागार संजय सोनावणे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीस उपाध्यक्ष संजय कदम, सरचिटणीस हरेश साठे, कार्यकारिणी सदस्य प्रवीण मोहोकर, राजेंद्र पाटील, राजू गाडे, भरतकुमार कांबळे व इतर सदस्य उपस्थित होते.

सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यात मोलाचे कार्य केल्याबद्दल पनवेल उरण आगरी समाज मंडळाच्यावतीने मंचाचे सल्लागार संजय सोनावणे, अविनाश कोळी, दीपक घोसाळकर यांचा मंचाच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Exit mobile version