मनसेतर्फे समाजोपयोगी कार्यक्रम

। पनवेल । वार्ताहर ।
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस विविध समाजोपयोगी कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. यानिमित्ताने खारघर व पनवेल शहरातील मनसेचे सर्व पदाधिकारी, विद्यार्थी सेना, वाहतूक सेना व महाराष्ट्र सैनिकांनी आपापल्या प्रभागात विवीध सामाजिक उपक्रम राबविले. केवळ होर्डिंग्ज आणि बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन अवाजवी खर्च न करता सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून गोर गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यासाठी पनवेल, खारघर परिसरातील महाराष्ट्र सैनिकांनी प्राधान्य दिले.

पनवेल येथील रिक्षा स्टँड येथे लहान मुलांच्या हस्ते राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचा केक कापण्यात आला. यावेळी मनसे रायगड जिल्हा उपाध्यक्ष अतुल चव्हाण, खारघर शहर अध्यक्ष प्रसाद परब, खारघर शहर सचिव संतोष पंडित, खारघर शहर विद्यार्थी सेना अध्यक्ष ओमकार वेदांते, पनवेल शहर उपाध्यक्ष संजीव पाटील, उप शहर अध्यक्ष तथा कार्यक्रमाचे आयोजक संजय मुरकुटे, विद्यार्थी सेना पनवेल शहराध्यक्ष अनिमेष ओझे, वाहतूक सेना पनवेल शहराध्यक्ष सिद्धेश खानविलकर, नवीन पनवेल माजी शहराध्यक्ष पराग बालड, खारघर शाखा अध्यक्ष जयेश विसावे, सचिन मोरे, पनवेल शहर शाखाध्यक्ष आकाश दलाल, खारघर विभाग अध्यक्ष सुशील विश्‍वास यांच्यासह आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

सोमवारी दिवसभरात वृक्षारोपण, लसीकरण केंद्र व कोविड सेंटरवर जाऊन फळे व पाणीवाटप, सुरक्षारक्षकांना कपड्यांचे वाटप, सॅनिटायझर वाटप, वृद्धाश्रमात धान्य वाटप, रिक्षाचालकांना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले.

Exit mobile version