वाहनतळ, कचरा समस्या सोडवा

{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"transform":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

। कर्जत । प्रतिनिधी ।

डेक्कन जिमखाना परिसरातील दुचाकी, चार चाकी व रिक्षा वाहनतळ व कचर्‍याच्या समस्येबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून व स्थानिक रहिवाश्यांकडून नगरपरिषद प्रशासनास व पोलीस ठाण्यात निवेदन देण्यात आले.

कर्जत शहरामध्ये वाढते नागरिकरण होत असल्याने कर्जत नगरपरिषदेमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. शहरामधील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. दुचाकी, चार चाकी वाहनतळासाठी जागा उरत नसल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालय कर्जत ते युको बँकच्या दरम्यानच्या रस्त्याला व छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते स्टेशनपर्यंतच्या रस्त्याला मोठ्या प्रमाणात रिक्षा, दुचाकी, चार चाकी उभ्या केल्या जातात. शनिवार, रविवारी लोकांना चालण्यासाठीदेखील जागा नसते. अशाप्रकारे गाड्या उभ्या केल्याने त्यांच्यावर बंधन राहिलेले नाही. कर्जत नगरपरिषदेने संबंधीत वाहने उभे करण्याची व्यवस्था गाड्या लावण्यासाठी योग्य ठिकाण उपलब्ध करुन द्यावे, त्यामुळे डेक्कन जिमखान्यामधील लोकांना रस्ते मोकळे करुन देण्यास हातभार लावावा. त्याचप्रमाणे या क्षेत्रामधील कचरादेखील इतरत्र पडलेला असतो. कर्जत नगरपरिषद कोणत्याही प्रकारे कचरादेखील उचलत नाही. या कचर्‍याची व्यवस्था नगरपरिषदेने करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. नगरपरिषदेने कोणत्याही प्रकारची उपाययोजना न केल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून कर्जत नगरपरिषदेवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा देत कायमस्वरुपी मार्ग काढावा अशी मागणी निवेदनात केली आहे.

Exit mobile version