। मुंबई । दिलीप जाधव ।
मुरुड तालुक्यातील मौजे डाकेली, वांदेली व पारगाव या गावातील ग्रामस्थांसाठी सुमारे 30 वर्षांपूर्वी भारत निर्माण पेयजल योजनेंतर्गत दोन पाण्याच्या टाक्या बांधण्यात आलेल्या आहेत. परंतु सदर टाक्यातून पाणी सोडण्यास काली नामदेव ठाकूर रा.म्हाळुंगे बुद्रुक मज्जाव करत आहेत. मौजे डाकेली, वांदेली, पारगाव या गावातील ग्रामस्थांच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी व जाण्या-येण्याचा मार्ग पूर्वपार सुरू करण्यासाठी शासनाने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आ.जयंत पाटील यांनी विधान परिषदेत केली.
पाण्याच्या टाक्यांतील पाणी सोडण्यासाठी जाणा-येण्याचा रस्ता व जंगलात जाण्याचा पूर्वापार असलेल्या मार्गावर ठाकूर हिने कंपाऊंड टाकून सदरचा मार्ग बंद केलेला आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना पिण्याचा प्रश्न निर्माण झालेला असून जंगलात जाणा-येण्याचा मार्ग ही बंद झालेला आहे. सदर प्रकरणी ग्रामस्थांनी विचारणा केली असता तुमच्यावर अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी काली ठाकूर देत असल्याची आ.जयंत पाटील यांनी या विशेष उल्लेखात म्हटले आहे.