। पनवेल। वार्ताहर ।
बापाला लोखंडी सळईने मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी मुलगा बाळाराम गणा चौधरी, नातू प्रेम बाळाराम चौधरी, आणि रेणुका बाळाराम चौधरी (चिखले) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गणा मारुती चौधरी हे चिखले येथे राहत असून, ते गावात देव दर्शनाला गेले होते. गावदेवी मंदिर चिखले येथे आले असता मुलगा बाळाराम चौधरी व नातू प्रेम चौधरी यांनी त्यांचा हात पकडला आणि लोखंडी सळई घेऊन दोन्ही पायावर मारहाण केली. यात ते जखमी झाले. त्यानंतर पाठीवर आणि हातावर सळईने आणि लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. यावेळी रेणुका यांनी शिवीगाळ केली. शेती माझ्या नावावर कर नाहीतर सोडणार नाही असे बाळाराम यावेळी बोलत होता. तासाभरानंतर त्यांची मुलगी आणि जावई आल्यानंतर त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
शेतीच्या वादातून मुलाकडून वडिलांना लोखंडी सळईने मारहाण
