| कोर्लई | प्रतिनिधी |
ॲल्टस गुड हेल्थ प्रायव्हेट लिमिटेड संचलित मुरुड तालुक्यातील नांदगाव येथील आयुष्य हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या सेवेचा तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयुष्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. नूतन माळी व डॉ. स्नेहा माळी-फासे यांनी केले आहे.
नांदगाव मजगांव पंचक्रोशीतील रुग्णांना आवश्यक अशा सोनोग्राफीसाठी यापूर्वी अलिबाग, पेण, मुंबई येथे जावे लागत होते. याठिकाणी सोनोग्राफी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याने गरोदर माता, हृदय 2 डी पोटाची व किडणी तपासणी करण्यात येऊन अत्यल्प दरात आधुनिक उपचार करण्यात येणार आहेत.
यावेळी आयुष्य हॉस्पिटलच्या संचालिका डॉ.नूतन माळी, डॉ.स्नेहा माळी-फासे, रामलिंग माळी, हृदयरोग तज्ञ डॉ. शिवशरण भारत, डॉ. राजेंद्र शितोळे उपस्थित होते.







