नेदरलँडकडून दक्षिण आफ्रिकेचा पराभव

टी-20 विश्‍वचषकात मोठा उलटफेर

| अ‍ॅडलेड | वृत्तसंस्था |

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी-20 विश्‍वचषकात नेदरलँडच्या संघाने सर्वांनाच आश्‍चर्याचा धक्का देत दक्षिण आफ्रिकेचा 13 धावांनी पराभव केला. या पराभवासह आफ्रिकेचा संघ विश्‍वचषक स्पर्धेतून बाहेर पडला आहे.

प्रथम फलंदाजी करताना नेदरलँडने 4 बाद 158 धावा केल्या होत्या. सलामीवीर स्टीफन मायबर्ग आणि मॅक्स ओ डाऊन यांनी सुरुवातीला चांगली फटकेबाजी केली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी 58 धावांची भागेदारी केली. त्यानंतर मार्करमने मायबर्गला 37 धावांवर बाद करत नेदरलँडला पहिला धक्का दिला. तसंच मॅक्स ओ डाऊन हादेखील 29 धावांवर बाद झाला. मात्र टॉम कूपने 19 चेंडूंत 35 धावा, तर कॉलिन एकरमॅन याने 26 चेंडूंत 41 धावा फटकावत नेदरलँडला 158 एवढी सन्मानजनक धावसंख्या उभारून दिली.

दरम्यान, नेदरलँडने दिलेलं 159 धावांचं आव्हान गाठण्यात दक्षिण आफ्रिकेचा संघ अपयशी ठरला. आफ्रिकेच्या संघाला 20 षटकांत 145 धावाच करता आल्या. या पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेचं विश्‍वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे.

Exit mobile version