| कोलकाता | वृत्तसंस्था |
भारताविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ सोमवारी जाहीर करण्यात आला. दुखापतीतून सावरल्यानंतर कर्णधार टेम्बा बावुमा संघात परतला. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला कसोटी सामना 14 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे आणि दुसरा कसोटी सामना 22 नोव्हेंबरपासून गुवाहाटी येथे खेळला जाईल.
सप्टेंबरमध्ये इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात बावुमाला दुखापत झाली होती. त्यानंतर तो नवीन वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला होता, जी 1-1 अशी बरोबरीत संपली. या आठवड्यात पाकिस्तानमध्ये सुरू होणाऱ्या कोणत्याही व्हाईट-बॉल सामन्यातही तो खेळणार नाही. पाकिस्तान मालिकेसाठी बहुतेक संघ कायम ठेवण्यात आला आहे, डेव्हिड बेडिंगहॅमची जागा बावुमाने घेतली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा संघ
टेम्बा बावुमा (कर्णधार), एडन मार्करम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेन, डेवाल्ड ब्रेविस, झुबेर हमझा, टोनी डी जॉर्जी, कॉर्बिन बॉश, विआन मुल्डर, मार्को जॅनसेन, केशव महाराज, सेनुरान मुथुसामी, सिमॉन हरमेरडा, कागिसो रबाडा.






