चिमण्या नामशेष होण्याच्या मार्गावर

| रसायनी । वार्ताहर ।

रसायनी परिसराच्या निसर्गरम्य वातावरणात काळ्या, पिवळ्या, निळ्या अशा विविध रंगाच्या चिमण्या घराच्या आजूबाजूच्या परिसरात सकाळच्या वेळी उडत येवून किलबिलाट करत. तर करड्या रंगाच्या चिमण्या घरामध्ये फोटोच्या तस्बरी, रिकामे कोनाडे यामध्ये वास्तव्य करत असत. परंतु मोबाईल कंपन्या व त्यांनी जागोजागी उभारलेल्या टॉवर यामुळे रामप्रहरी झोपेतून जागे होताना ऐकू येणारा चिमण्यांच्या किलबिलाटाचा आवाज जवळजवळ बंद झाला आहे.

मोबाइल टॉवरच्या रेडिओ लहरीमुळे चिमण्यासारख्या लहान पक्षांच्या अत्यंत छोट्या असलेल्या मेंदूरवर विपरीत परिणाम होवून चिमण्यांचे प्रजनन मोठ्या प्रमाणावर कमी झाल्याने चिमण्याच्या जाती नामशेष होत आहेत. पावसाळा संपल्यानंतर भात शेतीची कापणी झाल्यानंतर या चिमण्यांना त्याठिकाणी खाद्य मिळत नसल्याने त्या वेळी नागरी वस्त्यांच्या भागात येतात. परंतु त्या पुन्हा जंगलात गेल्या नाहीत तर त्या आजारी पडून मृत्यूमुखी पडत असल्याचे चित्र दिसून येते. पर्यावरणप्रेमींनी चिमण्या वाचविण्यासाठी प्रयत्न केल्यास चिमण्यांच्या जाती वाचू शकतील.

Exit mobile version