| चौल | प्रतिनिधी |
यंदा मान्सूनने अपेक्षित हजेरी लावली नसल्याने पावसासाठी प्रार्थना करण्याच्या उद्देशाने श्रीराम भक्त मंडळ खालची आळी व श्री भिमेश्वर देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने श्री भिमेश्वर मंदिरात विशेष संततधार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 23 जून 2026 (मंगळवार) रोजी सूर्योदय ते सूर्यास्त या कालावधीत पार पडणार असून, यावेळी रुद्रपठण व ‘ॐ नमः शिवाय’ मंत्रजप करण्यात येणार आहे. या धार्मिक कार्यक्रमात भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.







