आर.के.पाटील यांची नेत्रदीपक कामगिरी

| हमरापूर | प्रतिनिधी |

प्राचार्य आर.के. पाटील यांनी शैक्षणिक क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली असून सामाजिक व राजकीय क्षेत्रातील देखील ते चांगले काम करत असल्याचे उद्गार अलिबाग मतदारसंघाचे माजी आ. पंडित पाटील यांनी कार्यक्रम प्रसंगी केले. ते स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शिक्षक म्हणून सेवा बजावून प्रा. आर.के. पाटील हे सेवानिवृत्त झाले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

पाटील यांनी केलवणे, कासू, म्हसळा,आजिवली, दिवे, चणेरा, जोहे, कारखेल, वावोशी, गुळसुंदे, जिते, साई व पुन्हा आजीवली या शाळांवर शिक्षक म्हणून काम करून अनेक विद्यार्थ्यांना घडविले आहेत. यावेळी शेकाप जिल्हा चिटणीस ॲड. आस्वाद पाटील, खालापूर उपनगराध्यक्ष संतोष जंगम, स्मिता पाटील, एस.एम. गवळी, ए.बी.सुलगेकर, प्राचार्य बोराटे, प्राचार्य कुभाकार, प्राचार्य एस.आर.पाटील, सत्यविजय पाटील, अशोक मोकल, ए.जी.पाटील, ए डी पाटील, अनंत पाटील, दिलीप पाटील, विनोद पाटील, नरेश गुरुजी, सचिन पाटील, पंडित म्हात्रे, सुगंधा पाटील, सुभाष दाभाडे तसेच नातेवाईक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version