। माणगाव । प्रतिनिधी ।
बारावीच्या परीक्षेत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अशोकदादा साबळे विद्यालय व माणगाव ज्युनिअर कॉलेज माणगाव या उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी उज्वल यशाची परंपरा कायम राखीत नेत्रदीपक यश संपादन केले. या बारावी परीक्षेमध्ये कॉलेजच्या विज्ञान शाखेचा एकूण 100%, वाणिज्य शाखेचा 95.48% तर कला शाखेचा 98.38% इतका लागला आहे.
या कॉलेजमध्ये विज्ञान शाखेतून अक्षत चव्हाण या विद्यार्थ्याने 88.83 % इतके गुण संपादन करून कॉलेजमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळविला आहे. तर, सारा चौधरी या विद्यार्थिनीने 87.83 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक, अंजली चौधरी या विद्यार्थिनीने 86.83 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. वाणिज्य शाखेमधून सोहम जांबरे या विद्यार्थ्याने 68.17 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून श्नुती शिंदे या विद्यार्थिनीने 68 % गुण मिळवून द्वितीय क्रमांक, कावेरी तूपट या विद्यार्थिनीने 67.67 % गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळविला आहे. कला शाखेमधून सलोनी खराडे या विद्यार्थिनीने 76.83 % गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला असून, विनय भोनकर या विद्यार्थ्याने 73.17 % गुण मिळवून द्वितीय, तेजस तळेकर या विद्यार्थ्याने 73 % गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावत उत्तीर्णत झाले आहेत.