| वाघ्रण | प्रतिनिधी |
पेढांबे ग्रामपंचायतीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त शुक्रवारी (दि.6) सकाळी 10 वाजता वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. दीप प्रज्वलन करून शिवपुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षा सरपंच रसिका पाटील, प्रमुख अतिथी जिवीता पाटील, पोलीस उपनिरीक्षक नलावडे, मुस्लीम सेलचे इसूफ कुरेशी आदींसह दिपक पाटील, अनिल पाटील, स्वाती पाटील आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पेठांबे ग्रांमपंचात सदस्य रुपेश पाटील यांनी सादर केले. त्यानंतर स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी जवळपास 20 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. निकाल जाहीर होताच दोन गटांतील विद्यार्थ्यांना प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ असे रोख रक्कम, मानचिन्ह व पदक अशा स्वरूपात बक्षिसे मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. तर, इतर सहभागी विद्यार्थ्यांना सर्वांना पदक देऊन प्रोत्सारीत करण्यात आले.
शिवजयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा
