शेतीच्या कामांना वेग; शेतकर्‍यांना पावसाची प्रतीक्षा

| आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरूड तालुक्यातील शेतकरी खरीप हंगामासाठी सज्ज झाला. शेतीच्या मशागतीची कामे जोरदार सुरू असून, काही ठिकाणी ही कामे पूर्णत्वाकडे आली आहे. पीक कोणते घ्यावे याची चर्चा शेतकर्‍यांमध्ये जोरात आहे. यंदा चांगला पाऊसमान होईल, अशी अपेक्षा शेतकर्‍यांची आहे.
रब्बी हंगाम संपल्यानंतर पुढच्या हंगामाची सोय करण्यासाठी शेतकर्‍यांनी दिवस-रात्र मेहनत करुन शेत तयार केले आहे. खरीप हंगामासाठी शेत तयार करण्याचे काम काही गावात पूर्ण झाले असून, शेतकरी आता पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पाऊस येण्याला काही दिवस शिल्लक असले तरी नेमके कोणते पीक घ्यावे, यासाठी शेतकरी चिंतातूर आहे.

शेतकरी खरीप हंगामासाठी पीक काढल्यानंतर आलेल्या पैशातून खरीप हंगामाच्या तयारीला लागतो. यावेळी शेतकर्‍यांना काही पिकांना बरा भाव मिळाला होता. परंतु, महागाईमुळे शेतकरी त्रस्त आहे. शेताला फक्त आता पावसाची अपेक्षा असून, पुरेसा पाऊस पडल्यास शेतकरी पेरणीच्या कामाला लागणार आहे. कचरा वेचण्याचे कामही पूर्ण झाले असून, शेत नांगरणीसाठी तयार आहे. दरम्यान, या खरीप हंगामात कोणते पीक घ्यावे, याबाबत शेतकर्‍यांमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. बरेच शेतकरी कृषी केंद्रांवर जाऊन बियाणे आणि खतांची विचारपूस करीत आहेत. चिंटू, रुपाली, भडस, कोलम आदींसह पिकांची लागवड करणार आहेत.

Exit mobile version