| परभणी | प्रतिनिधी |
ऊस घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकने दोन मोटारसायकलस्वारांना उडविल्याची घटना रविवारी (दि.16) परभणी शहरातील गंगाखेड रोडवर रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर अन्य एक दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
रविवारी गंगाखेड रोडवर पिंगळगढ नाल्याजवळ भरधाव ट्रकने दोन मोटारसायकलस्वारांना चिरडले. यामध्ये एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. घटना घडल्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी ट्रकला आग लावली आणि त्यानंतर तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे काही काळ परिसरात तणाव निर्माण झाला. पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत, परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.