भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू

| पुणे | प्रतिनिधी |

पुण्यात हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली. हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर मंगळवारी (दि.02) सकाळी अपघात झाला. या सिमेंट मिक्सर ट्रक आणि दुचाकीच्या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात एकच खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यात हांडेवाडी मंतरवाडी मार्गावर एचपी पेट्रोल पंपासमोर मंगळवारी सकाळी ट्रक आणि दुचाकीचा अपघात झाला. पुण्यातील फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सिमेंट मिक्सर ट्रक चालकाला ताब्यात घेतलं. त्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष कांबळे (49) रा. हांडेवाडी रोड मुळगाव अहिल्यानगर, सदाशिव गोरख फुलावळे (36), रा.उरुळी देवाची अशी अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वारांची नावे आहेत. तर पोलिसांनी नागेश नाना कोरडे (35) ता. म्हाडा सोलापूर या ट्रक चालकाला अटक केली आहे. मृत संतोष आणि सदाशिव हे दोघे दुचाकीवरून हांडेवाडीकडून मंतरवाडीच्या दिशेने जात होते. एचपी पेट्रोल पंपासमोर त्यांची दुचाकी घसरली. त्यावेळी मागवून येणाऱ्या सिमेंट मिक्सर ट्रकने धडक दिल्याने दुचाकी एका बाजूला पडली. त्यामुळे दुसऱ्या बाजूला पडलेल्या दोघांच्या अंगावरून ट्रक गेल्याने दोघांचा जागीच मृत्य झाला. अपघातानंतर पोलिसांनी सिमेंट मिक्सर ट्रक चालक नागेश नाना कोरडे याला ताब्यात घेण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने ट्रक चालकावर अपघात प्रकरणी गुन्हा नोंदवला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Exit mobile version