भाकरवड येथे आध्यात्मिक कार्यक्रम

| भाकरवड । वार्ताहर ।
अलिबाग तालुक्यातील भाकरवड येथे किशोर शंकर पाटील यांनी उभारण्यात आलेल्या मंदिरात प्रभू श्री राम जन्मोत्सव सोहळा गुरुवार (दि 30) संपन्न झाला. वडिलोपार्जित रामनवमी स्व. शंकर चांगु पाटील व स्व निराबाई शंकर पाटील यांच्या विचारांचे जतन करत पुरातन मंदिराचे नव्याने उभारणी करून या श्रीराम मंदिराचे किशोर पाटील, विद्या पाटील, किरण पाटील, प्रतीक्षा पाटील यांच्या अथक परिश्रमाने हा वारसा अविरतपणे चालू ठेवला आहे. या निमित्ताने विविध आध्यात्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमोद जुईकर यांनी ग्रंथ वाचन केले तर कीर्तनसेवा विद्याधर महाराज, हरिजागर मरीआई प्रासादिक सेवा भजन मंडळ भाकरवड यांनी केले. यावेळी 500 हुन अधिक जणांनी दर्शन घेतले.

Exit mobile version