चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

। नेरळ । वार्ताहर ।

कर्जत शहरातील दहिवली येथील यशोदा मंगल सभागृहात एका भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या चित्रकला स्पर्धेत 550 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कर्जतमधील बालकलाकारांना त्यांच्या कलेला व सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चित्र रेखाटा, रंग भरा या कल्पनेच्या पंखांशी उंच भरारी घ्या, असे ब्रीद वाक्य असलेल्या चित्रकला स्पर्धे आयोजन केले होते. या स्पर्धेत पहिली ते दहावीच्या विद्याथ्यर्थ्यांनी साडे पाचशेच्या आसपास सहभाग नोंदविला होता. सदरच्या चित्रकला स्पर्धा पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आली. चांगली चित्र रेखटणार्‍या पहिल्या तीन स्पर्धक बालकलाकारांना पारितोषिके देण्यात आली. परीक्षक म्हणून चित्रकला सुनील परदेशी यांनी काम पाहिले. गट पहिली ते दुसरी प्रथम क्रमांक अर्पिता कोळी, द्वितीय निधी पवार, तृतीय रिदांत महाबळे. गट तिसरी चौथी-प्रथम क्रमांक सायली कोळी, द्वितीय क्रमांक लावण्या चव्हाण, तृतीय साहिल देशमुख. गट पाचवी ते सातवी-प्रथम क्रमांक देवांश शेळके, द्वितीय आशिष मंडक, तृतीय तन्मय शेठ, गट आठवी ते दहावी- प्रथम क्रमांक प्रतीक पालवे, द्वितीय मुग्धा व्यापारी, तृतीय साक्षी दरेकर यांचा समावेश आहे. सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यात आले.

Exit mobile version