64 जणांनी केले रक्तदान
| नागोठणे | वार्ताहर |
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा पंधरवडा अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून नागोठणे जिल्हा परिषद गटाकडून मंगळवार (दि.20) येथील डॉ. कुंटे यांच्या दवाखान्यात सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत संपन्न झाले.
नवी मुंबई येथील डी. वाय.पाटील हॉस्पीटल मधील रक्तपेढीच्या सहकर्याने संपन्न झालेल्या या रक्तदान शिबिरात सुमारे 64 पिशव्या रक्तसंकलन करण्यात आले. यावेळी मारुती देवरे, श्रेया कुंटे, सोपानभाऊ जांबेकर,आनंदभाऊ लाड, किशोर म्हात्रे, सचिन मोदी, शीतल नांगरे,प्रियांका पिंपळे, ज्ञानेश्वर शिर्के, विवेक रावकर, तिरतराव पोलसानी, सिराजभाई पानसरे, सुभाष पाटील, उपस्थित होते.
या रक्तदान शिबिरासाठी डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयातील र् प्राची नायर, डॉ. सुमेधा शिंदे, डॉ. मेलवीन, राजेश पाटील, सुचीता अग्रवाल, निलेश खानोलकर, कुसूम गुप्ता, हासिम शेख, आफ्रिन पटेल, मोजरा खान, साहील डिओटे व आरती भोंग आदींचे सहकार्य मिळाले.