रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

अनिरुध्द राणे मित्रमंडळ आयोजित उपक्रम

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अनिरुध्द राणे मित्रमंडळ आयोजित स्व. अनिरुध्द राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नागावमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. शेकापच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम रविवारी (दि.19) नागाव ग्रामपंचायत सभागृहामध्ये पार पडला.

यावेळी नागावच्या सरपंच हर्षदा मयेकर, माजी सरपंच नंदकुमार मयेकर, सदस्य निखील मयेकर, उपसरपंच सुरेंद्र नागलेकर, श्रीकांत आठवले, मंगेश राणे, मंजुषा राणे, सुरज म्हात्रे, शुभम नाईक, विप्रय सावंत, अभिषेक राणे, प्रसाद राऊत आदी मान्यवरांसह अनिरुध्द राणे मित्रमंडळाचे पदाधिकारी, व रक्तदाते तसेच रक्तपेढी विभागाचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. शितल स्वामी,रक्तपेढी तंत्रज्ञ सुनील बंदिछोडे, हेमकांत सोनार, अभिषेक घरत, सुशांत भगत, रिध्दी गुरव, जयेश विधाते, वैभव कांबळे, उमेश पाटील, महेश घाडगे आदी उपस्थित होते. या शिबिरामध्ये एकूण 110 जणांनी रक्तदान करून बांधिलकी जपली. अनिरुध्द राणे सामाजिक बांधिलकी जपत दरवर्षी त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आयोजित करीत होते.त्यांची आठवण म्हणून नागावमध्ये मित्रमंडळाच्यावतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले होते.

Exit mobile version