रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

| पनवेल | वार्ताहर |

नवीन पनवेल रोटरी क्लब ऑफ स्टील टाऊन यांच्यावतीने आयोजित रक्तदान शिबीर कार्यक्रमाला रक्तदात्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी 127 लोकांनी रक्तदान केले.

या क्लबतर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे हे पाहून डिस्टिक गव्हर्नर यांनी या कार्यक्रमाचे व क्लबचे अध्यक्ष मीनाक्षी भटनगर यांचे तोंड भरून कौतुक केले. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता आरएसएस शाखा नवीन पनवेल यांनी मेहनत घेतली. त्यामुळे क्लबच्यावतीने आरएसएस शाखेचे आभार मानण्यात आले. या कार्यक्रमासाठी लायन्स यशवंत ठाकरे, बन्सीधर, गईरोला, वाय पी सिंग, अहुजाजी, सरिता सदरांनी, हरणीशा शेट्टी, जुल्का, श्रेया, जागृती, सरिता यांची प्रमुख उपस्थिती होती. शेवटी प्रत्येक रक्तदात्याचा अल्पोहार व भागवत गीता, सर्टिफिकेट देऊन गौरव करण्यात आला.

Exit mobile version