125 रक्तबॅगा संकलित, उम्मत-ए मुस्लिम कमिटीचा उपक्रम
| माणगाव | वार्ताहर |
प्रेषित मोहम्मद पैगंबर सर्वांसाठी, रक्तदान हे जीवनदान व सर्वश्रेष्ठ दान असून आपल्या रक्ताच्या एका थेंबाने एखाद्याचा जीव वाचू शकतो हि समाज सेवी भावना नजरेसमोर ठेऊन उम्मत-ए मुस्लिम कमिटी माणगाव यांच्यावतीने ईद-ए मिलाद -उन -नबी निमित्ताने शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तपेढी यांच्या विशेष सहकार्याने रविवारी (दि. 22) सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह (रेस्ट हाऊस ) जुने माणगाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभून 125 रक्तबॅगा संकलित करण्यात आल्या.
शिबिराच्या सेवाभावी उपक्रमास शिवसेना पक्षाचे राज्य प्रवक्ते अँड.राजीव साबळे, जिल्हा शासकीय रुग्णालय अलिबाग रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शितल स्वामी, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुभाष केकाणे, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर, तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काका नवगणे, सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णा जाधव, शर्मिला सत्वे, नगरसेवक दिनेश रातवडकर, जेष्ठ पत्रकार मजीद हाजीते, कमलाकर होवाळ, आजेश नाडकर, माजी उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, माजी नगरसेवक नितीन वाढवळ, हेमंत शेट, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र मोरे, सुमित काळे, अल्ताफदादा धनसे, राजू मोरे, उणेगाव माजी सरपंच राजेंद्र शिर्के, मस्जिद मोहल्ला अध्यक्ष अब्दुलरहिमान हाजीते, बाजारटेप मोहल्ला उपाध्यक्ष गुलजार खान, सर्फराज अत्तार एकता क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक राहुल दसवते यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेटी देऊन आयोजकांचे कौतुक केले.
या शिबिराच्या सुरुवातीला मुफ्ती मुझफ्फर सेन यांनी ईद ए मिलादचे महत्व आपल्या मार्गदर्शनात सांगितले. सदर शिबीर यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी अलिबागचे अलिबाग रक्तपेढीच्या रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शितल स्वामी, वैभव कांबळे, रामेश्वर मुळे, गणेश सुतार, रिद्धी गुरव, नीलिमा जिरंगे, मनीषा नवाले, उमेश पाटील, रोहित सूर्यवंशी, उम्मत – ए.मुस्लिम कमिटी माणगावतर्फे मुफ्ती मुझफ्फर सेन, अकबर परदेशी, सिराज परदेशी, शादाब गैबी, बशीर करेल, सर्फराज अफ़वारे, सिराज अफ़वारे, फहद करबेळकर, शहानवाज अत्तार, नदीम परदेशी, इरफान हाजीते, रफिक जामदार, शाजान जळगावकर, अफाक दांडेकर, रिहाना मुल्ला, सुहेब परदेशी, आदिल गजगे, बशीर करदेकर, शब्बीर परदेशी, ताबिश जामदार, रिजवान चरफरे, हाजीमिया करदेकर, फहीम वाडेकर, इस्माईल पालेकर, मुसद्दीक जिलानी, फैज परदेशी, मुसतुफा वाडेकर, वसीम सनगे, मोहसीन नदाफ, तौसिफ़ सैयद, इंझमाम गोटेकर, सलमान कागदी, नदीम दुस्ते, मुन्नवर शेख, मन्सूर मुकादम, रिजवान मुकादम, रुमान जामदार यांच्यासह सर्व सहकार्यानी विशेष परिश्रम घेतले.