| उरण | वार्ताहर |
शेतकरी कामगार पक्ष पुरस्कृत व आम्ही उलवेकर मित्र मंडळ तसेच आम्ही उलवेकर महिला मंडळ, महेश स्पोर्ट्स क्लब शेलघर यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा उलवेमध्ये उलवेतील सर्वात मोठे नेत्र दीपक नवरात्रौत्सव मोठया उत्साहात साजरी केली जाणार आहे. त्या अनुषंगाने गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7:30 वाजता सद्गुरू स्वीट चौक, सेक्टर 17 ते स्व. जनार्दन घरत क्रिडांगण, प्लॉट नंबर 68, सेक्टर 17 उलवे येथे महा आगमन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे या सोहळ्याची दखल मुंबईच्या मंडळाने देखील घेतली आहे. रायगड जिल्हामधून फक्त उलवेच्या कुलस्वामिनी आणि आम्ही उलवे कर मित्र मंडळ हयांची देखल घेतली गेली आहे. त्यामुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. यंदाचे नवरात्रौत्सवचे हे 7 वे वर्ष असून या नवरात्र उत्सव दरम्यान रील व्हिडिओ स्पर्धा, गरबा डान्स स्पर्धा, फेन्सी ड्रेस स्पर्धा आदी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्तांनी नवरात्रातील सर्व उपक्रमात सहभागी व्हावे तसेच देवीचे दर्शन घ्यावे. असे आवाहन आम्ही उलवेकर मित्र मंडळचे संस्थापक सचिन राजे येरुणकर यांनी केले आहे.