| नागोठणे | वार्ताहर |
कोएसोच्या बापूसाहेब देशपांडे विद्या संकुलातील आनंदीबाई प्रधान विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2024 दरम्यान स्वच्छेताही सेवा या मोहिमेंतर्गत विविध कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याचाच एक भाग म्हणून प्रा. तुलसीदास मोकल यांच्या हस्ते या मोहिमेची सुरूवात झाली. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात त्यांनी राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने राबविण्यात येणार्या विविध प्रकल्पांची स्वयंसेवकांना माहिती दिली.
याप्रसंगी विद्यार्थ्यांनी स्वच्छता ही सेवा या विषयावरील पोस्टर प्रदर्शनचे अनावरण करण्यात आले. या प्रसंगी सर्व विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. दिनेश भगत यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना विभागाने राबवले. या आठवड्यात दत्तक गावात स्वच्छता करण्यात येणार आहे. तसेच स्वच्छता ही सेवा या विषयावर पोस्टर प्रदर्शन आयोजित केले जाणार असल्याचे कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. श्रीकृष्ण तुपारे यांनी सांगितले. या कार्यक्रमात एकुण 110 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन कार्यक्रम अधिकारी डॉ. मनोहर शिरसाठ यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक साहिल घरत, अभिजीत कुंभार, राहुल कुमावत, श्रावणी मरवडे, कोमल म्हात्रे इ. सह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.