‌‘ज्ञानांकुर’च्या क्रीडा स्पर्धा उत्साहात

| गोवे-कोलाड | वार्ताहर |

रोहा तालुक्यातील तसेच खांब विभागातील इंग्रजी शिक्षण माध्यमात अग्रेसर असलेल्या मंजुळा एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीचे ज्ञानांकुर इंग्लिश मिडियम स्कूल खांब येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात संपन्न झाल्या.

या स्पर्धेचा शुभारंभ कोलाड लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन नरेश बिरगावले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी लायन्स क्लबचे संस्थापक अध्यक्ष लायन डॉ. सागर सानप, लायन प्रो. माधव आगरी, उपाध्यक्ष लायन डॉ मंगेश सानप, केंद्रप्रमुख रत्नाकर कनोजे, देवकान्हेचे उपसरपंच सूरज कचरे, ला. अलंकार खांडेकर, ला. नंदकुमार कळमकर, भगवान तुपकर, सचिन गोळे, रवींद्र कन्हेकर, शाळेचे संस्थापक/अध्यक्ष रवींद्र लोखंडे, मुख्याध्यापिका रिया लोखंडे, शिक्षिका ऋतुजा पवार, प्रतिक्षा धामणसे, शुभदा भालेकर, प्रज्ञा माने, स्नेहा मोहिते, नीलम दळवी, नवनिता देवकर आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या स्पर्धेत विविध खेळ खेळले गेले. यात कबड्डी, रस्सीखेच, डॉजबॉल, 100 व 200 मीटर धावणे, थाळीफेक, गोळाफेक, उंच उडी, लांब उडी, त्याचबरोबर फनी गेम्स- चमचा गोटी, बुक बॅलन्स, पोटॅटो रेस, चित्रकलेतून हत्तीला शेपूट लावणे आणि मडका फोडी अशा विविध खेळांच्या स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

Exit mobile version