| कर्जत । वार्ताहर ।
श्री स्वामी समर्थ मठ पळसदरी येथे श्री स्वामी समर्थांचा प्रकट दिन साजरा. यावेळी हजारो भाविकांनी स्वामींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला. प्रतटदिनानिमित्त पहाटेपासून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे काकडआरती, सकाळी महा अभिषेक, स्वामी याग, दुपारी महाआरती, महाप्रसाद तसेच दुपारी हेमांगी पाकणीकर आणि सहकारी यांचा सुर संस्कार प्रस्तुत भक्तीनाद हा भक्ती गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. याप्रसंगी विक्रांत दरेकर, राजू पोतदार, वकील राजेंद्र निगुडकर, दिनेश अडावदकर,वकील प्रदीप सुर्वे, अभि दरेकर,अशोक शितोळे, सदानंद लोखंडे, दादू दरेकर, नरेंद्र दरेकर, महेंद्र निगुडकर, दिलीप पांडे, वत्सला वांजळे, राजन मेहता, संजय मालगुंडकर, रघुनाथ निगुडकर, ग्रामस्थ तसेच हजारोंच्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
पळसदरीत श्री स्वामी समर्थ प्रकट दिन
