अपघातात सहा प्रवासी आणि बस चालक जखमी
| पाताळगंगा | वार्ताहर |
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर बस आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघात बसमधील सात जण जखमी झाले आहेत. रुग्णालय दाखल करण्यात आले आहे. सदरची घटना सकाळी 9 वा. च्या सुमार घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरघाटातील नवीन बोगद्यात राज्य परिवहन महामंडळाची बस पुणे ते मुंबई अशी प्रवाशांना घेऊन जात असताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले व समोर जाणाऱ्या वॅगनारला पाठीमागून धडकली. या अपघातात सहा प्रवासी व एसटी बस चालक जखमी झाले. जखमींना एम.जी.एम.रुग्णालय कळंबोली येथे दाखल करण्यात आले होते. तिथे किरकोळ जखमीवर उपचार करून सोडून देण्यात आले आहे.