करंबेळे येथे एसटी बस दरीत कोसळली; 11जण जखमी

| रत्नागिरी | वार्ताहर |

देवरुख-संगमेश्वर एसटीबस दरीत पलटी होऊन झालेल्या अपघातात 11 प्रवाशी जखमी झाले. करंबेळेनजीक काल, गुरुवारी (दि.20) हा अपघात झाला. देवरुख-संगमेश्वर राज्यमार्गावर देवरुखातुन सुटलेली एसटीबस 3.30 ला देवरुखहुन संगमेश्वरला जात असताना बसचालक निळोबा मुंडे याचे बस वरील नियंत्रण सुटले.

करंबेळे मोरीच्या पुढील बाजुस ही बस संजय महाडीक यांच्या कंपाउंडमध्ये रस्ता सोडुन २० फुट दरीत कोसळली. यामध्ये 11 प्रवाशी जखमी झाले आहेत. दुर्वा मनोज गोसावी (29 रा. मुचरी गोसावीवाडी), संतोष रावजी कुवळेकर (55 रा. निवळी), सुगंधा रघूनाथ सोळकर (50 लोवले पडयेवाडी), सायली संजय गुरव (35 पिरंदवणे), काव्या संजय गुरव (14) शिवाजी सीताराम पवार (69 कारभाटले), अभिजित धोंडीराम येडके (रा. देवरुख), रमाकांत रामदास दुर्गवले (18, मुर्तवडे), अर्चना अशोक ओक (चिपळूण), वैशाली विष्णू पडवेकर (फणसवणे), अमृता आशिष भिडे (39) हे जखमी झाले. जखमींना ग्रामस्थांनी तात्काळ संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी देवरुख आणि संगमेश्वर पोलिस स्थानकाच्या पोलिसांनी भेट देऊन पाहणी केली. देवरुख पोलिस आणि देवरुख आगाराचे व्यवस्थापक हनुमंत फडतरे आणि अधिकारी यांनी पंचनामा केला. माजी राज्यमंत्री रविंद्र माने, नेहा माने यांनी अपघात स्थळी भेट देऊन पाहणी केली.

Exit mobile version