मोदी दौऱ्याचा एसटी प्रवाशांना फटका?

रायगडमधून 371 एसटी बसेसची मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रस्तावीत अनिश्चित दौरा ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईमध्ये असणार आहे. त्यानिमित्ताने रायगडमधून सुमारे 371 एसटी बसेसची मागणी करण्यात आली आहे. एसटी अभावी नियमीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या दौऱ्यामुळे फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 13 व 14 ऑक्टोबरला मुंबई व नवी मुंबईत येणार असल्याची चर्चा गेल्या पंधरा दिवसापासून सुरू आहे. एका अभियानाचा शुभारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील बचत गटातील महिलांना पाचारण करण्यात आले आहे. ग्रामपंचायत स्तरावर उमेदमधील महिलांशी संवाद साधून त्यांना कार्यक्रमाला येण्यास सांगितले आहे. जाण्या येण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यात आली असल्याचेही सांगण्यात आले. मोदींच्या अनिश्चित प्रस्तावित दौऱ्यासाठी रायगडमधून 371 एसटी बसेसचे मागणी असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून मिळाली आहे. जिल्ह्यात सुमारे 480 एसटी बसेस आहेत. यापैकी 371 बसेस दौऱ्याला पाठविल्यास त्याचा परिणाम दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Exit mobile version