एसटी सेवा पुन्हा पूर्णतः बंद

। तळा । वार्ताहर ।
तळा तालुक्यातील एसटी सेवा शनिवारपासून पूर्णतः बंद झाली आहे. यामुळे बसस्थानकात एसटीची वाट बघत असलेले प्रवासी खोळंबले होते. एसटी कर्मचार्‍यांचे राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारला असल्याने सर्वत्र एसटी वाहतूक बंद करण्यात आली होती. यावर परिवहनमंत्री अनिल परब यांनी कर्मचार्‍यांचा पगार वाढवून देण्याचे आश्‍वासन दिल्यानंतर जिल्ह्यात काही प्रमाणात एसटीची वाहतूक सुरू करण्यात आली होती. परंतु, पुन्हा अचानक या बस बंद करण्यात आल्या आहेत.

Exit mobile version