मुंबई | प्रतिनिधी |
एसटी कर्मचारी संप मागे घ्यायचा की नाही याबाबतचा निर्णय गुरुवारी(25 नोव्हेंबर) घेण्याची घोषणा आम.सदाभाऊ खोत यांनी केली.परिवहन मंत्र्यांसमवेत झालेल्या बैठकीनंतर संपकरी कर्मचार्यांसमवेत चर्चा करण्यासाठी सदाभाऊ खोत,गोपीचंद पडळकर आदी मंडळी आझाद मैदानावर आली होती.यावेळी उपस्थित कर्मचार्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.मात्र,सरकारच्या पगारवाढीसह अन्य सुविधांबाबत आम्ही रात्रभर आझाद मैदानावरच बसून चर्चा करणार आहोत.त्यानंतरच संप मागे घ्यायचा की नाही याचा निर्णय गुरुवारी जाहीर करु असे खोत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सुचित केले.
दरम्यान,सरकारने पगारवाढीची घोषणा केली असली तरी अजूनही काही कर्मचारी संघटना विलिनीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत.त्यावर आता चर्चा केली जाणार आहे.या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.