शेकापच्या पाठपुराव्यामुळे एसटी सुरु

। उरण । वार्ताहर ।
कोरोना काळात उरण- पनवेल एसटीच्या फेर्‍या कमी करण्यात आल्या होत्या. यामुळे नागरिकांना प्रवास करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. कोरोना संपल्यावरही एसटीच्या फेर्‍या न वाढविल्याने सर्वसामान्य नागरिकांसह नोकरदार, कर्मचारी, व्यापारी तसेच शाळा कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्थांना याचा फटका बसत होता. या मार्गावर प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. प्रवाशी संख्येचा विचार करता त्या प्रमाणात वाहनांची संख्या फारच कमी होती.

या फेर्‍या वाढविण्यात याव्यात याबाबत शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ऑगस्ट महिन्यात एसटी आगारात निवेदन शेकापचे शहर चिटणीस शेखर पाटील याच्यावतीने देण्यात आले होते. या निवेदनाची दखल घेत आगाराचे व्यवस्थापक सतीश मालचे यांनी रात्रीच्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता तसेच रात्र पाळीवर काम करणारे नोकरदार यांच्या समस्या लक्षात घेऊन उरणहून पनवेलला जाण्यासाठी रात्री 9.30 वाजता गाडी सुरु केली आहे.

Exit mobile version