काशिद बिचवरील स्टॉल्स 16 जूनपासून बंद

। कोर्लई । वार्ताहर ।
मुरुड तालुक्यातील काशिद बीचवरील विविध खाद्यपदार्थ स्टॉल्स यंदाही दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात दि.16 जून ते दि.15 ऑगस्ट या कालावधीत बंद ठेवण्यात येणार आहेत. पर्यटनात याठिकाणी असलेल्या स्पिडबोट, बनाना बोट, पॅरोसेलिंग बोट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात बंद करण्यात आल्या आहेत तसेच पावसाळ्यात दि.16 जून पासून येथील विविध स्टॉल्स दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आले आहेत. या कालावधीत पर्यटकांनी पोहण्यासाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ तसेच स्टॉल्स धारकांतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version