| कोर्लई | प्रतिनिधी |
पर्यटनात प्रसिद्ध असलेला मुरुड तालुक्यातील काशिद समुद्रकिनारा पावसाळ्यात दोन महिन्यांसाठी बंद करण्यात आला आहे. तसेच, सुरक्षेचा उपाय म्हणून रस्त्यालगत सुचना फलक देखील लावण्यात आले आहेत. त्यामुळे पर्यटकांनी सुचनांचे पालन करुन समुद्रात जाऊ नये, असे आवाहन ग्रामपंचायत, ग्रामस्थ, स्टॉलधारक, मुरुड पोलीस निरीक्षक यांच्यावतीने करण्यात आले आहे. तसेच, दरवर्षीप्रमाणे यंदाही काशिद समुद्रकिनाऱ्यावरील विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स पावसाळ्यात दि.16 जून ते 14 ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्यात आले आहेत. याठिकाणी असलेल्या स्पिडबोट, बनाना बोट, पॅरोसेलिंग बोट मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच बंद करण्यात आल्या आहेत.







