अनेकजण जखमी
| आंध्र प्रदेश । वृत्तसंस्था ।
तिरुपती बालाजी मंदिरात बुधवारी (दि. 08) रात्री मोठी दुर्दैवी घटना घडली. मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेकजण जखमी झाले आहेत. देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उडालेल्या गोंधळामुळे ही दुर्घटना घडली.
तिरुपती येथील भगवान व्यंकटेश्वर मंदिराच्या वैकुंठ गेटवर बुधवारी हि दुर्घटना घडली. तिरुमला तिरुपती देवस्थानने 9 डिसेंबरपासून दर्शनासाठी टोकन व्यवस्था सुरू केली आहे. तिरुपती मंदिराच्या 9 केंद्रांमध्ये 94 काउंटरद्वारे वैकुंठ दर्शन टोकन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ते टोकन घेण्यासाठी बुधवारी सायंकाळपासूनच भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान टोकन वाटप करताना भाविकांमध्ये गोंधळ उडाल्यामुळे चेंगराचेंगरी झाली. यात आत्तापर्यंत सहा भाविकांचा मृत्यू झाला असून जवळपास 30 जण जखमी झाले आहेत. जखमींवर नजीकच्या रुइया हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. घटनेतील मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे.