चित्रा पाटील यांचे प्रतिपादन
कुर्डूसमध्ये विकासकामांचा प्रारंभ
अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
तळागाळातील सर्वसामान्य जनतेसाठी जो पक्ष कार्य करीत आहे त्याच्या पाठीशी समाज अथवा ग्रामस्थ ठामपणे उभे राहिले तर समाजाचा गावाचा विकास हा शंभर टक्के होईल यात शंका नाही आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्या चित्रा पाटील यांची कुर्डुस विभागात कामाच्या वचनपूर्ती आणि काही विकास कामे यांच्या भूमिपूजन कार्यक्रमात केले.
यावेळी माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील,कुर्डुस माजी सरपंच रामभाऊ कर्वे, संदीप पाटील, ग्राम पंचायत सदस्या वनिता शेळके, सारिका नाईक, जनार्दन लेंडी,संगीता नाईक सहित कार्यकर्ते,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जसजशा निवडणूक जवळ येत जाते तसतसे हौशी लोकप्रतिनिधी यांचा प्रादुर्भाव हा वाढत जातो. सन2010 मध्ये मी ग्रामपंचायत सदस्य असताना 2012 पासून आजपर्यंत जिल्हा परिषद सदस्या म्हणून काम करीत असताना जिल्हापरिषदेच्या माध्यमातून जनहिताची कामे करण्याची संधी मिळाली. पक्षाने मला घडविले आहे. पक्ष वाढीसाठी तळागाळातील जनेतची कामे गरजेचे आहेत असेही चित्रा पाटील यांनी सांगितले.
कुर्डूस हा शेकापचा बालेकिल्ला आहे.येथील सर्व विकासकामे ही शेकापच्या माध्यमातून करण्यात आलेली असून,यापुढेही विकासकामे सुरुच राहणार आहेत.चित्रा पाटील या त्यासाठी प्रयत्नशील राहणार आहेत.
पंडित पाटील,माजी आमदार





