| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील अतिदुर्गम भाग व निसर्गाच्या सानिध्यात आलेले गाव म्हणजे विंधणेवाडी येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन आणि विंधणेवाडी यांच्या संयुक्त ग्राम शिक्षा केंद्राचे उदघाटन करण्यात आले.
महात्मा जोतिबाफुले यांच्या पुण्यतिथी निमित्त विंधणेवाडी येथे ग्राम शिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले. या कार्यक्रमाला दीपक कातकारी, नागेंद्र म्हात्रे, निवास गावंड, अक्षय कोळी, संदीप पाटील, चौघले, सुनंदाताई वाघमार, प्रतिश कातकरी, कुश वाघमारे, स्नेहाताई पाटील, रणिता ठाकूर, सुनिता पाटील, प्रेरणा ठाकूर, सोनाली म्हात्रे, काशीराम निरगुडे व माता पालक उपस्थीत होते.
कार्यक्रमाची सुरुवात वाडीवरून ग्रंथदिंडीने करण्यात आली. या दिंडीत वाचाल तर वाचाल, ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा, अशा घोषणा देत गावातून रॅली काढण्यात आली. यात गावकर्यांनी ही त्यांच्याजवळ असलेली पुस्तके देण्यात आली. मुख्याध्यापक संदीप सर व ऑक्सिजन पार्क चे नागेंद्र सर यांच्याकडून पुस्तके देण्यात आली. या कार्यक्रमाचे उद्घाटक नागेंद्र सर यांच्याकडून श्रींची प्रतिमा पूजन आणि नारळ वाढवून करण्यात आले. सूत्रसंचालन रणिता ठाकूर यांनी केले.
या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांनी गावकर्यांना आणि मुलांना पुस्तकांचे महत्त्व पटवून दिले आणि चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला गोडी यावी म्हणून सिद्धेश पाटील सारडे यांच्याकडून मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. या ग्राम शिक्षक केंद्रासाठी आकाश फाउंडेशन मुंबईतर्फे वाडीवरील मुलांना बसण्यासाठी सतरंज्याही देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेंद्र म्हात्रे सरांनी केले.
मोठया उत्साहाने व आनंदाने वाडीवरच्या माता पालकांच्या आणि पाहुण्यांच्या उपस्थितीत ग्राम शिक्षा केंद्र स्थापन करण्यात आले. सर्व माता पालकांना आनंद झाला नवनवीन पुस्तके आम्हाला व आमच्या मुलांना वाचायला मिळणार म्हणून त्यांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन चे खूप खूप आभार मानले. कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करणारे भोजराज क्षीरसागर प्रथम कोकण झोन प्रोग्राम हेड यांचे खूप खूप धन्यवाद.







