ईसाळवाडी येथील राजिप शाळा सुरू करा; गटशिक्षणाधिकारी यांना निवेदन

। पाताळगंगा । वार्ताहर ।
चौक बाजारपेठेच्या ठिकाणांहून 4 की.मी असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी असलेली ईसाळवाडी आहे. मात्र आज मुले शालेय शिक्षणांपासून वंचित आहे. या ठिकाणी रायगड जिल्हा परिषदेची शाळा होती. मात्र पटसंख्या घटल्यामुळे ती बंद करण्यात आली. मात्र आज त्या वाडीमध्ये जवळ-जवळ 16 ते 18 मुले शिक्षणांपासून वंचित असल्यामुळे त्या ठिकाणी असलेली शाळा पुन्हा सुरु करण्यासाठी ग्रामस्थ आणि शिक्षक संघटनेच्या माध्यमातून गट शिक्षणाधिकारी चोरमले यांना निवेदन देण्यात आले.
आपल्या मुलांना शालेय शिक्षण मिळावे. त्यांनी अशिक्षित राहु नये. मात्र गावापासून असलेली शाळा खूप लांब असून, विद्यार्थ्यांना रोज चालत जाणे शक्य नाही.शिवाय पालकांची स्थिती उत्तमच असते नाही. यामुळे बंद पडलेली शाळा सुरु झाल्यास चौक सारख्या ठिकाणी न येता गावातच त्यांना शिक्षण मिळाल्यास येथिल मुले शाळेपासून वंचित राहणार नाही. यासाठी पालक वर्ग, शिक्षक संघटना एकत्र आले असून तेथिल मुलांना शिक्षण मिळावे हाच या मागील उद्दिष्टे असल्यांचे त्यांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.
यावेळी पंचायत समिती सदस्य खालापूर कमल भस्मा, सामाजिक कार्यकर्ते कमळू पारधी, जैतु पारधी, बुध्या पारधी, बामा पारधी, रमेश भवर, प्रविण पारधी, यशवंत दोरे, पांडुरंग पारधी, जैतु पारधी, अंकुश वाघ, शिक्षक सेना अध्यक्ष, जितेंद्र ठाकूर, विस्तार अधिकारी पाडवी, पालवे, स्वराज स्वामी, दिपक ठाकूर, अमित मिडगुले, विश्‍वास सावळे, संदीप सुर्वे तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रदिप गोंधळी, ग्रुप ग्रामपंचायत प्रशासन अधिकारी, तांडेल, राजेश देशमुख आदी उपस्थित होते.

मला ईसाळवाडी येथे शाळा सुरु करण्यासाठी शिक्षक, पालक, सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून निवेदन आले असून या माध्यमातून सकारात्मक विचार केले जावून या संदर्भात पुर्ण तपशिल जाणून घेवून शाळा सुरु होण्यासाठी प्रयत्न करेन.

चोरमले, खालापूर गट शिक्षणाधिकारी


Exit mobile version