माथाडींवर उपासमारीची वेळ

मराठी कामगार सेनेने हाणून पाडला डाव

| पनवेल | प्रतिनिधी |

कळंबोली स्टील मार्केट येथे असलेल्या स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमध्ये माथाडी कामगार गेली अनेक वर्षे राबत आहेत. कंपनीच्या नियमांनुसार याठिकाणी काम होणे गरजेचे असताना कामगार युनियनचे अध्यक्ष, मुकादम आणि कंपनी व्यवस्थापनाचे अधिकारी यांनी हातमिळवणी करून चुंबकीय प्रणालीद्वारे काम करण्यास सुरुवात केली. याचा फटका माथाडी कामगारांना बसला असून, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

दरम्यान, कंपनीतील 600 माथाडी कामगारांपैकी 450 कामगारांनी मनसेच्या कामगार सेनेचा आधार घेत आपल्या हक्कासाठी तीन दिवसीय काम बंद आंदोलन केले. यावेळी कंपनी व्यवस्थापनाकडे माथाडी कामगारांसाठी एका वॉगेनसाठी 18 हजार दिले जात होते आणि आजही येत आहेत, मात्र पूर्वी दिले जाणारे पैसे आता कमी करून कामगारांना केवळ 2600/- रुपये दिले जात असल्याचा आरोप कामगारांनी केला आणि काम बंद आंदोलन केले. अखेर कंपनी व्यवस्थापनाने याची दखल घेऊन दि. 29 डिसेंबर रोजी बैठक लावून यातून मार्ग काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर कामगारांनी पुन्हा काम सुरू केले.

कळंबोली येथील स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीतील कामगारांवर अन्याय करताना त्यांच्या पगारामध्ये 80 टक्के कपात करून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. कंपनी व माथाडी कामगार यांच्यामधील झालेला करार विचारात न घेता मायजॅक (चुंबक) पद्धतीने काम केले जात असल्याने त्यांच्या नोकरीवर गदा आली. कामगारांना मिळत असलेल्या तुटपुंज्या पगरामुळे कामगार उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे आपल्यावरील अन्यायाला वाचा फोडताना कामगारांनी मराठी सेनेच्या मध्यमातून तीन दिवस काम बंद आंदोलन केले होते. त्यामुळे कंपनीने कामगारांशी वाटाघाटी करून यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत दिनांक 29 डिसेंबर रोजी बैठक लावून प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन कंपनी व्यवस्थापनाने कामगारांना दिल्यानंतर कंपनीमध्ये काम सुरू करण्यात आले. मराठी कामगार सेनेचे महेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्टील ॲथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड कंपनीमधील माथाडी कामगारांनी काम बंद आंदोलन सुरू केले. ते आंदोलन तीन दिवस सुरू राहिले. कंपनी व्यवस्थापनाने माथाडी कामगारांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करून आपल्या मागण्यांचा विचार केला जाईल. त्यासाठी 29 डिसेंबर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याचे लेखी आश्वासन दिले.

Exit mobile version