अंकुश जाधव यांना राज्यस्तरीय पुरस्कार

। खांब-रोहा । वार्ताहर ।
महाराष्ट्र शिक्षक पॅनलच्या वतीने राज्यातील गुणवंत शिक्षकांना देण्यात येणारा राज्यस्तरीय सेवा सन्मान आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 हा पुरस्कार रोहा तालुक्यातील निवी गावातील शिक्षक अंकुश जाधव यांना प्रदान करण्यात आला. शामल अंकुश जाधव हे मोहन पाटील एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष श्री सतीश मोहन पाटील यांच्या न्यू इंग्लिश स्कूल कळंबोली विद्यालयात गेली 18 वर्षे कार्यरत आहेत. जाधव यांना 60 % शारीरिक अपंगत्व आहे. या अपंगत्वावर मात करीत त्यांनी शैक्षणिक ,सामाजिक, धार्मिक ,सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सेवासन्मान राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 त्यांना देण्यात आला आहे.

Exit mobile version