मुंबईत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा

| मुंबई | प्रतिनिधी |

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि. 9 ते 12 डिसेंबर या कालावधीत स्थानिक पुरुष व महिला गट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी असो. व मुंबई शहर कबड्डी असो. च्या मान्यतेने श्रमिक जिमखाना, ना. म. जोशी मार्ग, मुंबई येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे. मातीच्या 3 क्रीडांगणावर खेळविण्यात येणार्‍या या स्पर्धेत दोन्ही विभागात 12-12 निमंत्रित संघांना सहभाग देण्यात येणार आहे.

अंतिम विजयी होणार्‍या (दोन्ही गटात) संघाना भव्य चषक व रोख रु. पन्नास हजार (50,000/-), तर उपविजयी संघांना चषक व रोख रु. पंचवीस हजार (25,000/-) प्रदान करण्यात येतील. उपांत्य उपविजयी चारी संघांना प्रत्येकी चषक व रोख रु.अकरा हजार (11,000/-) देण्यात येतील. अधिक माहितीकरिता अनिल पाटील 9869977167 किंवा कृष्णा तोडणकर 8928469719 यांच्याशी संपर्क साधावा.

Exit mobile version