राज्यस्तरीय कराटे स्पर्धा

जिंदाल स्कुलचे विद्यार्थी चमकले

| नागोठणे । प्रतिनिधी ।

मुंबईतील घाटकोपर येथे दि. 31 डिसेंबर रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत नागोठण्याजवळील सुकेळी येथील जिंदाल माऊंट लिटेरा झी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी रायगडच्या संघातून सहभागी होत चमकदार कामगिरी केली आहे. यामध्ये जिंदाल माऊंट लिटेराच्या कु. स्मित कामतेकर (कुमिते -रौप्य पदक, काता सुवर्ण पदक) व आध्य शिंदे (कुमिते – कांस्य पदक, काता सुवर्ण पदक) या दोन खेळाडूंचा समावेश आहे.

या स्पर्धेमध्ये मार्शल आर्ट स्पोर्ट अकॅडमीच्या 28 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये रायगडच्या संघातील मार्शल आर्ट्स स्पोर्ट्स अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी 24 सुवर्ण, 19 रौप्य व 11 कास्य पदकांची कमाई करून प्रथम चॅम्पियनशिप पटकावत रायगड जिल्ह्याचे नाव क्रीडा क्षेत्रात उज्वल केले आहे. या यशाबद्दल संघाचे मुख्य मार्गदर्शक कल्पेश शिंदे व सर्व खेलाडूंचे कौतुक होत असून त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या चॅम्पियनशिपचे आयोजक सियान कमलेश कसबे, सिहान राज कपूर बागडी, मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमीचे संस्थापक सेन्साई कल्पेश शिंदे तसेच मार्शल आर्ट स्पोर्ट्स अकॅडमीच्या इस्ट्रक्तर कुमारी रिया पाटील यांनी व त्यांच्या सहका-यांनी मेहनत घेतली.

Exit mobile version