गडब येथे राज्यस्तरीय पॅरा कबड्डी स्पर्धा

। खांब-रोहे । वार्ताहर ।
ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्ड महाराष्ट्र आयोजित आणि सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र, कुलाबा दिव्यांग क्रीडा असोसिएशन नवी मुंबई व कालंबादेवी युवक मंडळ गडब पेण यांच्या संयुक्त विद्यमाने रायगड जिल्ह्यातील गडब पेण येथे पहिली राज्यस्तरीय पॅरा कबड्डी चॅम्पियनशिप स्पर्धा 2022 या स्पर्धेचे आयोजन रविवारी (दि.22) करण्यात आले आहे.


या स्पर्धेत मुंबई, कोल्हापूर, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे, सांगली, नवी मुंबई, नाशिक या सहा संघाचा समावेश असणार आहे. रायगड पॅरा कबड्डी संघात ओमकार महाडीक माणगाव, अक्षय निकम रोहा, राजा मोकल पेण, मुकुल खाडे पेण, हेमंत मोरे रोहा, महेश वसावे नंदुरबार, जयेश पाटील पेण, निखिल बडे माणगाव यांची निवड करण्यात आली आहे. तर कर्णधार म्हणुन रमेश संकपाल कर्जत, प्रशिक्षक म्हणून गणेश पाटील पेण व व्यवस्थापक म्हणून शिवाजी पाटील रोहा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच नवी मुंबई पॅरा कबड्डी संघात कर्णधार म्हणुन मंगेश म्हात्रे पेण तसेच उमाजी जाधव रोहा, अनिल जाधव महाड, शैलेश शिंदे पेण, सुनिल खरात या रायगड जिल्ह्यातील दिव्यांग कबड्डी खेळाडूंची निवड करण्यात आली तसेच नवीमुंबई संघात चांगदेव शिरतर पुणे, रायसिंग वसावे नंदुरबार, सागर आईंनकर रत्नागिरी, इच्छाराम केळुसकर सिंधुदुर्ग, यश शरमकर मुंबई याचीही निवड नवीमुंबई संघात करण्यात आली आहे असे ऑल स्पोर्ट्स असोसिएशन फॉर द डिसेबल्डचे अध्यक्ष व सहकार्य अपंग कल्याणकारी संस्था रायगड महाराष्ट्र चे सचिव शिवाजी पाटील यांनी माहिती दिली.

Exit mobile version