। चौक । वार्ताहर ।
चौक येथील सरनोबत नेताजी पालकर शाळेचे शिक्षक शरद दत्तात्रय कुंभार यांना राज्यस्तरीय गुणवंत पुरस्कार मिळाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालय चौक ता. खालापूर मधील शिक्षक शरद दत्तात्रेय कुंभार यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी मुंबई यांच्या वतीने राष्ट्रीय शिक्षक दिनाचे औचित्य साधून देण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरव पदक, सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात पुरस्कार प्रदान करण्यात आला. शरद कुंभार हे शिक्षण व क्रीडाक्षेत्रात उल्लेखनीय काम करून सामाजिक बांधिलकी जपणारे आदर्श शिक्षक म्हणून त्यांची ओळख आहे. अशा या कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष शिक्षकाला राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार 2021 मिळाल्याबद्दल सर्वस्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
शरद कुंभार यांना राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार
