गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरेंचा राज्य दौरा

| मुंबई | प्रतिनिधी |

गणेशोत्सवानंतर उद्धव ठाकरे यांचा महाप्रबोघन महाराष्ट्र दौरा सुरु होणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यातच म्हणजेच टेंभी नाक्यावर ठाकरे यांची पहिली गर्जना होणार आहे तर महाप्रबोधन यात्रे ची सांगता कोल्हापुरातील बिंदू चौकात होणार आहे. ठाण्यातील सभेत त्यांच्यासोबतीला शिवसेनेचे सगळे ज्येष्ठ नेते असतील तसेच पक्षात नव्याने एन्ट्री केलेले नेते देखील सामील होतील. आतापर्यंत पत्रकार परिषदा, कार्यकर्ते पदाधिकार्‍यांना संबोधित करताना ठाकरे यांनी बंडखोर आमदार-खासदारांवर तोफ डागली. आता थेट मैदानी सभांच्या माध्यमातून आणि विशेष म्हणजे शिंदे यांच्या होमग्राऊंडवरुन शिंदेंना ललकारणार आहेत.

Exit mobile version