| शिहू | प्रतिनिधी।
विक्रम चालकांच्या प्रलंबित मागण्यान संदर्भात आमदार भरत गोगावले यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे सद्या परिस्थितीला न परवडणारी इको चार चाकी ऐवजी पर्यायी तीन चाकी सहा आसनी रिक्षा व कोरोनाकाळातील दोन वर्ष कालावधी वाढवून देण्याबाबत मागणी करण्यात आली. या वेळी श्री. गणेश चालक मालक संघटनेचे जनरल सेक्रेटरी जयराम खाडे, सुभाष शिर्के, हिरामण भोईर, अलिबाग संघटनेचे सुरेश घरत, कोलाड संघटनेचे विश्वास बागूल, चेतन परभळकर, योगेश सानप, माणगाव संघटनेचे सचिन धाडवे, निजामपूर संघटनेचे प्रदीप पवार, महाड पोलादपूर संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. विक्रम चालक मालक संघटनेचे प्रश्न लवकरात लवकर सोडविले जाणार असल्याचे समाधानकारक आश्वासन या वेळी गोगावले यांनी दिले.