| आगरदांडा | वार्ताहर |
नगर परिषद प्रशासन संचालनालय बेलापूर येथील आयुक्त तथा संचालक-मनोज कानडे यांना स्वच्छता व आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण कर्मचारी यांचे आरोग्य निरीक्षक संवर्गात समावेश करणे करीता विकल्प लवकरात लवकर मागवणे बाबत राज्य संघटना व स्वच्छता व आरोग्य निरीक्षक समन्वय समिती मार्फत निवेदन देण्यात आले. यावेळी अॅड.सुरेश ठाकूर साहेब, संतोष पवार, अॅड.सुनिल वांळूजकर, अनिल जाधव, अजिंक्य हुलवले, भूषण काबाडी, महेंद्र कांदळकर, रुपेश भोईर, आनंदा चौधरी, मनोज पुलेकर, महाराष्ट्र राज्यातील रायगड, अमरावती, जळगाव,धुळे, सातारा, पालघर,रत्नागिरी, कोल्हापूर, नंदुरबार, बुलढाणा, अहमदनगर, पंढरपूर, सिंधुदुर्ग, सोलापूर, नाशिक, वर्धा, परभणी, जालना, बुलढाणा, लातूर, ठाणे असे एकूण 21 जिल्ह्यामधील स्वच्छ्ता व आरोग्य निरीक्षक पदविका उत्तीर्ण कर्मचारी तसेच संघटनेचे पदाधिकारी बहूसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.