तरुणांना मिळतो रंगकामातून रोजगार, रायगड, रत्नागिरीत गणेशमूर्तींना मागणी
| गोवे-कोलाड | प्रतिनिधी |
रोहा तालुक्यातील कोलाड नाक्यावरील प्रदिप एकबोटे यांच्या गणपती कारखान्याची शंभर वर्षाची परंपरा आहे. या गणपती कारखान्यातून रोहा तालुक्यासह रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात गणपती मुर्तीची मागणी असते. यामुळे येथे तरुणांना रंगकामातून रोजगार उपलब्ध होत आहे. पूर्वी गणपती मूर्तीचे रंगकाम करण्यासाठी कामगार मिळत नव्हते परंतु आता शिक्षणात प्रगती झाल्यामुळे शाळा, कॉलेजचे विद्यार्थी कोलाड परिसरात रंगकाम करण्यासाठी हळूहळू तयार झाले आहेत. यामुळे या विद्यार्थ्यांना रोजगार मिळू लागला आहे.यामुळे प्रदीप एकबोटे यांच्याकडे वैभव ठाकूर, रितेश सुटे ,स्वप्नील सुतार, अभय दळवी हे सुंदर रंगकाम करीत असुन त्यांना या रंगकामातून चांगला रोजगार उपलब्ध होत आहे. माझ्या कारखान्यात पूर्वी शंभर ते दिडशे मुर्तींची मागणी होती. परंतु हळूहळू या मूर्तीची मागणी वाढत गेली व आजपर्यंत कारखान्यात 600 मुर्तीची मागणी वाढली आहे.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात माझ्या घराची व कारखान्याची हक्काची जागा संपादीत झाली असल्यामुळे गणेश मूर्तींसाठी कारखाना अपूरा पडत असल्याची खंत प्रदिप एकबोटे यांनी व्यक्त केली.